Advertisement

अबब ...! अवघ्या दोन दिवसात राज्यात 62 कोटी 55 लाखांची मद्यविक्री


अबब ...! अवघ्या दोन दिवसात राज्यात 62 कोटी 55 लाखांची मद्यविक्री
SHARES
महाराष्ट्र सरकारने मद्यविक्रीवरील बंधने उठवल्यानंतर अवघ्या दोन दिवसात राज्यात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपये किंमतीची 16 लाख 10 हजार बल्क लिटर दारु विक्री करण्यात आली आहे. तर अवैध विक्री प्रकरणी एका दिवसात 56 गुन्हे नोंदवून 28 जणांना अटक केली आहे.  या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 84.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालक उमा वर्मा यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वञ लाँकडाऊन करण्यात आले आहे. बंद उद्योग धंद्यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा ही मेटाकुटीला आला होता. आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी या हेतूने सरकारने राज्यातील दारूविक्रीवरील निर्बंध नियम आणि अटींच्या आधारे उटवले. ही बातमी सर्वञ पसरताच तळीरामांनी राञीपासूच वाईन शाँपच्या बाहेर रांगालावून गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा ही फज्जा उडाला. गर्दीला पांगवताना पोलिसांची ही दमछाक पहायला मिळत होती. राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये (गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) वगळून मद्यविक्री करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. सर्वच ठिकाणी परिस्थिती सारखीच होती.

सरकार पून्हा दारूविक्रीची दुकाने बंद करतील म्हणून नागरिक तासंतास रांगेत उभे राहून  हजारो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा खरेदी करत होते. अवघ्या दोन दिवसात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपये किंमतीची 16 लाख 10 हजार बल्क लिटर दारु विक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. माञ मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मद्यविक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता. मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा