Advertisement

Coronavirus: मुंबई विमानतळावरील CISF जवानाचा कोरोनाने मृत्यू


Coronavirus:  मुंबई विमानतळावरील CISF जवानाचा कोरोनाने मृत्यू
SHARES
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी याच कोरोना महामारीने मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या 55 वर्षीय CISF बळी घेतला. परदेशातून मुंबई विमानतळावर आलेल्या अनेक भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.

 
मुंबईच्या रक्षणासाठी सर्वच अत्यावश्यक सेवा शर्तीचे प्रयत्न करतान, दिसत आहेत. माञ हे प्रयत्न करत असताना ही अनेकांनाआपला जीव या महामारीमुळे गमवावा लागला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कोरोना या महामारीने चार पोलिसांचे बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच, गुरूवारी मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या CISF जवानाचा कोरोना या महामारीने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. वैद्यकिय चाचणीत CISF मधील आता पर्यंत 32 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याची वर्गवारी करुन कोरोनाची परिस्थिती पाहता नियम शिथिल करण्यात आले आहेत. 

दरम्यान मुंबईत मागील 24 तासात कोरोनाचे 25 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबईत गुरूवारी दिवसभरात 692 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावशक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबईत 11 हजार 219 रुग्णांची नोंद असून मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 437 वर जाऊन पोहचला आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा