Advertisement

बेस्टच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


बेस्टच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसनं चांगलंच टार्गेट केलं आहे. बेस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी कोरोनाबाधित कामगारांची संख्या ९ नं वाढून १३७वर पोहोचली आहे. तसंच, आत्तापर्यंत मृत कामगारांची संख्या ८ इतकी झाली आहे. त्यामुळं बेस्ट कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन वाहतूक पुरविली जाते. या विशेष फेऱ्या चालविताना बेस्टच्या चालक, कंडक्टरना कोरोनाची बाधा होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांची संख्या आणि फेऱ्यांची संख्या विषम आहे. त्यामुळं बससेवांमध्ये सुरक्षित वावर राखणं अशक्य होत आहे. बस चुकल्यास ड्युटीवर पोहोचता येणार नसल्यानं कर्मचारी नियमांची पायमल्ली करीत बसमध्ये गर्दी करीत आहेत. 

बेस्ट कामगारांमध्येही संसर्ग बळावत आहे. बेस्टमध्ये मंगळवारपर्यंत ६४ कामगार पूर्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यातील काही कामगारांना मधुमेह आणि इतर आजार असूनही त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा