मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. अशातच कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वर्ध्यातून मुंबईत डॉक्टर आल्याची माहिती समोर येत आहे. वर्ध्यातील महात्मा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४५ निवासी डॉक्टर मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या(डीएमईआर) आदेशानंतर २३०० खासगी डॉक्टर देखील काम करण्यासाठी पुढे आल्याची माहिती मिळते.
वर्धा येथील महात्मा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४५ डॉक्टरांची नियुक्ती डीएमईआरनेकेली आहे. मंगळवारी हे डॉक्टर मुंबईत दाखल झाले आहेत. बहुतांश विद्यार्थी हे औषधशास्त्र विभागातील तिसऱ्या वर्षांचे (परिक्षेसाठी सुट्टीवर गेलेले) तर पदविकाचे काही विद्यार्थी या चमूमध्ये आहेत. डीएमईआरच्या आदेशानुसार सुमारे १४ हजार डॉक्टरांनी माहिती नोंदविली आहे. यातील बहुतांश डॉक्टर विविध ठिकाणी कार्यरत असून २३०० डॉक्टरांनी पालिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामधील ७०० एमबीबीएस आहेत, तर १६०० तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
हेही वाचा - लाॅकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून, देशाला २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज - पंतप्रधान
जूनच्या पहिल्या आठड्यापर्यत मुंबईतील रुग्णांची संख्या सुमारे ७५ हजारांवर पोचण्याची शक्यता वर्तवली जात असून, कोरोना दक्षता केंद्र, आरोग्य केंद्रांमध्ये अधिकाधिक खाटा उभारण्याची तयारी पालिकेनं केली आहे. त्या तुलनेत डॉक्टरांचं मनुष्यबळ मात्र अपुरं आहे. त्यात खास कोरोना रुग्णालयांमध्ये तीव्र लक्षणं असलेल्या वा प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर अपुरं पडत असल्यानं रुग्णालयांवरही ताण येत आहे.
हेही वाचा -
२ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांनी धरली गावची वाट
कोरोनाच्या प्रत्येक मृतदेहामागे कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता