Advertisement

२ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांनी धरली गावची वाट

२ हजार काळीपिवळी टॅक्सीचालक आणि रिक्षा चालकांनी मुंबई सोडली आहे. गेल्या एक महिन्यांपासून टॅक्सी आणि रिक्षाचालकांनाच धंदा बसलेला आहे.

२ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांनी धरली गावची वाट
SHARES

मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या अनेक कर्मचारी वर्गाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मागील २ महिने केवळ घरात बसून काढल्यानं रोजगाराचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळं यावर उपाय म्हणून अनेकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. यामध्ये मुंबईतील काळी-पिवळी रिक्षा व टॅक्सी चालकांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ हजार काळीपिवळी टॅक्सीचालक आणि रिक्षा चालकांनी मुंबई सोडली आहे. गेल्या एक महिन्यांपासून टॅक्सी आणि रिक्षाचालकांनाच धंदा बसलेला आहे. त्यामुळे जगणं कठिण झालं आहे.

मुंबईत राहण्यापेक्षा आपलं गाव बर असं वाटल्यानं या टॅक्सी-रिक्षा चालकांनी मुंबई सोडल्याचा दावा मुंबई टॅक्सीमन युनियनचे नेते ए.एल. क्वॉड्रोस यांनी केला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीनं वाढत चालला आहे. त्यावरून लॉकडाऊन लवकर शिथिल होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी गावाची वाट धरली आहे.

आतापर्यंत २ हजार लोकांनी मुंबई सोडली असून अजूनही काही चालक मुंबई सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती क्वॉड्रोस यांनी दिली. काळीपिवळी टॅक्सीचालकांना इतर राज्यांसाठी परमिट देण्याची मागणी केली. यूपी, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशातील ड्रायव्हर मोठ्या संख्येनं आपल्या घराकडं रवाना होत आहेत. मुंबईत २० हजार काळीपिवळी टॅक्सी आणि २ लाखाहून अधिक रिक्षा आहेत.



हेही वाचा -

कोरोनाच्या प्रत्येक मृतदेहामागे कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा