Advertisement

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त

धारावी, माहिम व दादर विभागात मंगळवारी एकूण ६३ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे.

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त
SHARES

मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. त्याशिवाय माहीम आणि दादर परिसराला देखील कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. धारावी, माहिम व दादर विभागात मंगळवारी एकूण ६३ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. ६३ रुग्णांपैकी धारावीतील ४६, माहीममधील ६ आणि दादरमधील ११ नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर धारावी आणि दादरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

धारावीत ४६ रुग्ण सापडल्यानं धारावीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९६२ झाली आहे. तसंच, एकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या ३१ झाली आहे. धारावीत ६० फूटी रोड, नाईक नगर, कुंभारवाडा, काळा किल्ला, पीव्ही चाळ आणि न्यू म्युनिसिपल चाळीत प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. कुट्टुवाडी आणि ट्रान्झिस्ट कँम्प येथे प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. धारावी मेन रोड, इंदिरा कुरेशी नगर आमि राजीव गांधी नगरमध्ये प्रत्येकी ३ तर टी-जंक्शन इथं ५ रुग्ण सापडले आहेत. ९० फूटी रोड आणि धारावी क्रॉस रोड इथं प्रत्येकी ७ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा - Coronavirus Update: राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे

माहीम इथं ६ रुग्ण सापडल्यानं माहीममधील कोरोनाग्रस्तांची संख्या १४३ झाली असून मृतांचा आकडा ७ झाला आहे. माहीममधील २८ करोना रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी काशिनाथ बिल्डिंग, अरिहंत बिल्डिंग, न्यू पोलीस कॉलनी, गॅब्रीयल हाऊस, रनश्याम निवास आणि प्रजासेवक सोसायटीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे.

दादरमध्ये ११ नवे रुग्ण सापडल्यानं दादरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १२५वर गेली आहे. तसंच, मृतांची संख्या ७ झाली आहे. दादरमधील २१ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मंगळवारी चितळे रोडवरील गुलमर्ग सोसायटी, शिवाजी पार्क येथील गणेश भुवन, सुश्रुषा स्टाफ वसाहत, प्रियदर्शनी सोसायटी, देवी पद्माबाई चाळ, चिखले पथावरील गुलमोहर सोसायटी आणि लोकमान्य नगरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. तर जय हनुमान सोसायटी आणि दादर पोलीस लाइन इथं कोरोनाचे २ रुग्ण सापडले असून या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

चिंताजनक! राज्यात कोरोनाचे 1026 नवे रुग्ण, तीन दिवसात 142 जणांचा बळी

Coronavirus Pandemic: मुंबईत कोरोनाचे 426 नवे रुग्ण दिवसभरात 28 जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा