Advertisement

Coronavirua Updates: धारावीत ८५ नवीन रुग्णांची नोंद


Coronavirua Updates: धारावीत ८५ नवीन रुग्णांची नोंद
SHARES

मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच मुंबईतील लघू उद्योगांच ठिकाण आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येन १००० चा आकडा पार केला आहे. त्यातच सोमवारी दिवसभरात ८५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या १३२७ झाली आहे.

धारावीला कोरोना व्हायरसच्या साखळीचा पडलेला विळखा आणखी घट्ट झाला आहे. करोनाचं संकट गहिरं होत आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असतानाच, धारावीतील रुग्णसंख्याही त्याच गतीने वाढत आहे. या परिसरात आज दिवसभरात करोनाचे ८५ नवीन रुग्ण सापडले असून, या बाधितांमध्ये मुलांची आणि तरुण रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

माटुंगा लेबर कॅम्पमधील १४ वर्षीय मुलीला करोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच संत रोहिदास मार्गावरील ११ वर्षीय मुलासह मुकुंद नगरातील १४ वर्षीय मुलगी, राजीव गांधी नगरातील १५ वर्षीय मुलगाही करोनाबाधित असल्याचं निदान झालं आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ही १३२७ झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा