Advertisement

भांडुपमधील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी विठुरायाची मदत


भांडुपमधील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी विठुरायाची मदत
SHARES
Advertisement
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी लॉकडाऊन प्रमुख्यानं घेतला जात नसल्यामुळं मुंबईकरांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेल्या भांडुपमधील संक्रमणाला आळा घालण्यासाठी एस वॉर्डच्या मदतीला साक्षात विठ्ठल-रखुमाई आल्याचे दिसून येत आहे. 

वारंवार सूचना करूनही बहुतांश नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने हैराण झालेल्या एस वॉर्ड प्रशासनाने जनजागृतीचा वेगळी कल्पना राबवण्याचे ठरवले आहे. पुढील ३ दिवस एस वॉर्ड कार्यक्षेत्रात विशेषतः भांडुपमधील झोपडपट्टी व दाटीवाटीच्या परिसरात विठ्ठल-रखुमाईच्या वेशातील मास्कधारी कलाकार सुरक्षा नियमांबाबत जनजागृती करणार आहेत.

मुंबईतील अनेक भाग अनलॉकमधून पुन्हा लॉकडाउनमध्ये गेले आहेत. यामध्ये भांडुपचा समावेश असून नागरिकांची निष्काळजी एस वॉर्ड परिक्षेत्रात येणाऱ्या पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. भांडुपमधील रुग्णांची संख्या ४,२००हून अधिक असून प्रतिदिन किमान १०० नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी २६ दिवस असून रुग्णवाढीचा दर अद्याप ३ टक्के आहे.

यावर आळा घालण्यासाठी पुढील ३ दिवस २ कलाकार विठ्ठल-रखुमाईच्या वेशात मास्क घालून, विशेष रथातून सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहेत. हा रथ एस वॉर्डमधील हॉटस्पॉटसोबतच प्रामुख्याने भांडुपमधील स्लम भागांत फिरवण्याचे नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय
Advertisement