Advertisement

कोरोनामुळं कटिंग चहाच्या दरांमध्येही होणार वाढ


कोरोनामुळं कटिंग चहाच्या दरांमध्येही होणार वाढ
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरातील अनेक व्यवसाय, धंदे यांना टाळ लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं तब्बल ३ महिन्यांहून आधिक दिवस दुकान बंद असल्याने अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. मात्र

कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कार्यपद्धतीत करण्यात आलेल्या विविध बदलांमुळे प्रत्येक वस्तूंचे खरेदी दर वाढले आहेत. अशातच आता कटिंग चहाचा दर सरसकट १० रुपये करण्याचा निर्णय टी अँड कॉफी असोशिएशनतर्फे घेण्यात आला आहे. 

यापूर्वी कटिंग चहाचा दर ६ किंवा ७ रुपये इतका होता. त्यामुळे यापुढे सुरक्षित चहाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकरांना अधिक पैसे मोजवे लागणार आहे. मुंबईत जवळपास ५ हजार नोंदणीकृत चहाविक्रेते आहेत. यापैकी बहुतांश विक्रेते रस्त्यांलगत आपला व्यवसाय थाटतात. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात यापैकी अनेक चहाविक्रेत्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाचा सुरुवात केली. सध्या करोनामुळे आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्या चहाविक्रेत्यांना संसर्गाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत साशंकता सतावते आहे. यावर तोडगा म्हणून असोसिएशनने यापूर्वीच कोविड विशेष नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनामुळं चाहाच्या साहित्याव्यतिरिक्त इतर सुरक्षेच्या वस्तूंमुळ खर्च वाढणार आहे. त्यानुसार, प्लास्टिक कप, सॅनिटायझर, व्यवसायाच्या जागेवर निर्जंतुकीकरण यासाठी विक्रेत्यांना गाठीशी असलेले पैसे खर्च करायचे आहेत. तसेच चहापावडरचे दर देखील वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे चहाविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा