Advertisement

कोरोनाग्रस्त बेस्ट कामगाराचा मृत्यू

बेस्ट उपक्रमातील कामगारांमध्ये करोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

कोरोनाग्रस्त बेस्ट कामगाराचा मृत्यू
SHARES

बेस्ट उपक्रमातील कामगारांमध्ये करोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हळुहळू मृतांचा आकडाही वाढतो आहे. याआधी बेस्टच्या कामगाराचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका बेस्ट कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाग्रस्त बेस्ट कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. बुधवारी एकाच दिवसात करोनाची लागण झालेल्या कामगारांची संख्या सहानं वाढली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत करोनाग्रस्त कामगारांची संख्या ५५वर पोहोचली आहे. बुधवारी बेस्ट उपक्रमात स्टार्टर म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या कामगाराचा मृत्यू ओढवला.

४ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी, वाहतूक विभागातील ४, देखभाल दुरुस्ती आणि विद्युत विभागातील प्रत्येकी एका कामगारास करोनाची बाधा झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुर्वत आहे. मात्र, आता ही सेवा देत असताना त्यांच्यावरच कोरोनाचं संकट येत असल्याचं चित्र दिसत आहे.



हेही वाचा -

केडीएमसी आयुक्तांचा सीमाबंदीचा निर्णय स्थगित, वाचा नेमकं काय घडलं?

धक्कादायक! मुंबईत दोन दिवसात कोरोनाचे 51 बळी, तर दिवसभरात 769 नवे रुग्ण



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा