Advertisement

वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्‍चितता दूर करा- अमित देशमुख


वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्‍चितता दूर करा- अमित देशमुख
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं शाळा व कॉलेजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु परीक्षांबाबात योग्य निर्णय न झाल्यानं राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळं आरोग्य विज्ञान विद्यापीठानं याबाबत तातडीनं निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात त्यांना दिले आहेत.

राज्यातील वैद्यकीय  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणं नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. परंतु, सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांना परीक्षांबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय निर्णय घेणार याबद्दल शाशंका निर्माण झाली आहे. 

या परीक्षांबाबत विद्यापीठानं स्पष्ट भूमिका घेऊन याबाबतची अनिश्चितता तातडीनं दूर करावी अशी अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.  वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो हे खरे असले तरीही या संस्थांशी तातडीनं विचारविनिमय करून  परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशासूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.



हेही वाचा -

१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा