Advertisement

दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या- दलित युथ पँथर

खासगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात यावं दलित युथ पँथरकडून मुख्यमंत्र्यांकडं मागणी करण्यात आली आहे.

दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या- दलित युथ पँथर
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबईसह राज्यातील अनेक खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी कोरोनाच्या लक्षणांव्यतिरीक्त इतर आजारांवरील उपचाराकरीता उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे हाल झाले आहेत. त्यामुळं राज्य सरकारनं दवाखाने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दवाखाने सुरू करण्यात आले आहेत, परंतु बहुतांश डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळं ही खासगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात यावं. राज्य सरकारतर्फे त्यांना वैयक्तिक सुरक्षा संच उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होऊन सरकारी रुग्णालयांवरील भार कमी होईल, अशी मागणी दलित युथ पँथरकडून मुख्यमंत्र्यांकडं करण्यात आली आहे.

सरकारी दवाखाने, रुग्णालयं यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. राज्य सरकारतर्फे वांद्रे-कुर्ला संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी नवीन रुग्णालयं सुरू करण्यात येत आहेत. विषाणूचा फैलाव लक्षात घेता खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाची व्यवस्था लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वस्त्यांमधील खासगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात यावे.

राज्यातील मध्यम व मोठी खासगी रुग्णालये तसेच नर्सिंग होम राज्य शासनाने ताब्यात घ्यावीत. यासाठी रुग्णालय व नर्सिंग होमच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून मोबदला देण्याबाबत निर्णय करावेत. त्यामुळं प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध होईल व चांगल्या गुणवत्तेनं उपचार करणं शक्य होणार आहे. मुंबई आणि राज्यातील उपाहारगृहे सरकारने ताब्यात घ्यावीत. त्यांचा उपयोग कोरोनाग्रस्तांचे विलगीकरण करण्यासाठी करता येईल. काही उपाहारगृहांचे रुग्णालयात रूपांतर करणे शक्य होईल. बहुतांश मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे यामध्ये खर्चही कमी येईल.



हेही वाचा -

पावसाळ्यात लोकलचं वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती

२ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांनी धरली गावची वाट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा