Advertisement

केवळ २ किमी परिघातच संचाराची अट रद्द


केवळ २ किमी परिघातच संचाराची अट रद्द
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ३ महिने लॉकडाऊनमुळं घरी राहणाऱ्या मुंबईकरांना अनलॉक 1.0 च्या अंतर्गत घराबाहेर पडण्याची परवानगी मिळाली. सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी राज्य सरकारनं दिली होती. परंतु, कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता पुन्हा मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना घरापासून केवळ २ किलोमीटर परिघातच प्रवासमुभा दिली. मात्र, मुंबई पोलिसांच्या या अटीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारनं शुक्रवारी ही अट रद्द करत घराजवळच खरेदी करण्याचं आवाहन केलं. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी, समाज माध्यमातून ‘घराजवळच खरेदी करा, व्यायामासाठी घराजवळील मोकळ्या जागेत जा, असे नवे आवाहन शुक्रवारी केले. तर मुंबईत निर्बंध लागू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतही २ किमी परिघाची मर्यादा घालण्यात आलेली नाही.

२ किलोमीटर परिघाबाबतच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं. तसंच, ही अट रद्द केली.

मुंबईत रविवार आणि सोमवार अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.

मुंबईत मागील  चार दिवसात पोलिसांनी तब्बल ३४ हजार गाड्या जप्त केल्या आहेत. या सर्वांवर पोलिसांनी लाॅकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर बुधवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल ३ हजार ३८७ वाहने जप्त केली आहेत.



हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा