मुंबईत ३४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई शहर आणि उपनगरात १५ मे पासून ५ जून २०२० पर्यंत ३४ हजार ०४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्रीची सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मुंबईत ३४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरात १५ मे पासून ५ जून २०२० पर्यंत ३४ हजार ०४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्रीची सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. सोबतच याच कालावधीत राज्यभरातील ९ लाख ४७ हजार ८५९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याचंही उमाप यांनी सांगितलं. शुक्रवार ५ जून राेजी एका दिवसात ५९ हजार ४९८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.  

१ लाख १० हजार परवाने 

राज्य सरकारने मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,२६१ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानुसार १५ मे २०२० पासून राज्यात घरपोच मद्यविक्री योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ मे २०२० ते ३१ मे २०२० या काळात १ लाख २० हजार ५४७ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख १० हजार ७६३ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहेत.

हेही वाचा - अबब! चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

आॅफलाइन परवान्याचीही सोय

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता १०० रुपये किंवा आजीवन परवान्याकरीता १ हजार रुपये एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

९ लाखांचा माल जप्त

महाराष्ट्रात २४ मार्च, २०२० पासून लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसंच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. ५ जून २०२० रोजी राज्यात ७७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ९ लाख ६० हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२४ मार्च, २०२० पासून ५ जून २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ७२२५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३३४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ६६२ वाहने जप्त करण्यात आली असून १८ कोटी ६७ लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४X७  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येतं.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com हा ई-मेल आहे.

संबंधित विषय