Advertisement

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना 'केईएम'मध्ये थांबण्यास बंदी

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना 'केईएम'मध्ये थांबण्यास बंदी
SHARES
Advertisement

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावलं उचलत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनं आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. असातच बुधवारी महापालिकेनं केईएम रुग्णालयातील रुग्ण आणि रुग्णांसोबत असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईंकांना यापुढे फोनवरुन माहिती दिली जाणार आहे. राज्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा ३२ हजार पार झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्यापासून ते रुग्णालयात बेड आणि आयसीयूची सुविधा वाढवण्यावर महापालिकेकडून भर दिला जात आहे.

केईएम रुग्णालयात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी दाखल केलं तर त्याचे नातेवाईक सतत रुग्णालयात येतात. त्यामुळं रुग्णालयात फक्त गर्दी होत नाही तर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होण्याची जास्त भीती असते. पुढील दोन दिवसानंतर हा नियम लागू होईल. संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केईएम रुग्णालयाकडून दररोज कोरोनाबाधित रुग्णाची माहिती त्याच्या नातेवाईकांना फोनच्या माध्यमातून दिली जाणार आहे.हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालयसंबंधित विषय
Advertisement