Advertisement

बिहारला ट्रेन जाण्याची अफवा, तारापूरमध्ये मजुरांची गर्दी उसळली

बिहारच्या पटना शहरात जाण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकावरून ट्रेन सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरल्यानंतर तारापूरमधील एका शाळेच्या मैदानावर तब्बल २ हजार परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली.

बिहारला ट्रेन जाण्याची अफवा, तारापूरमध्ये मजुरांची गर्दी उसळली
SHARES

बिहारच्या पटना शहरात जाण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकावरून ट्रेन सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरल्यानंतर तारापूरमधील एका शाळेच्या मैदानावर तब्बल २ हजार परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली. त्यामुळे या मैदानात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजले. अखेर पोलिसांना मोठ्या मुश्कीलीने या परप्रांतीयांना हटवावं लागलं.

पालघरच्या विविध स्थानकांवरून राजस्थान आणि उत्तर प्रदेशसाठी काही विशेष श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. परंतु बिहारसाठी एकही ट्रेन अद्याप सोडण्यात आलेली नाही. त्यातच पालघर रेल्वे स्थानकातून बिहारसाठी देखील विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याची अफवा तारापूरमधील परप्रांतीय मजुरांमध्ये पसरली. त्यानंतर एकमेकांपर्यंत हा मेसेज पोहोचवत हजारो मजूर तारापूरच्या मैदानात गोळा झाले. या ठिकाणी आलेल्या बहुसंख्य मजुरांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तसंच या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही फज्जा उडाला. यांतील बहुतेक मजूर हे तारापूर एमआयडीसीत काम करणारे होते. 

हेही वाचा- Lockdown In Mumbai: मुंबईतल्या 400 रिक्षा, टॅक्सी जप्त, करत होते...

ज्यावेळेस बिहारसाठी कोणतीही ट्रेन रवाना होणार नाही, अशी माहिती या मजुरांना मिळाली. त्यानंतर संतापलेल्या मजुरांनी घोषणाबाजी करायला सुरूवात केली. मजुरांचा गोंधळ वाढत चालल्याने पोलिसांची जादा कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

दरम्यान अमरावती विभागात अडकलेल्या बिहारी परप्रांतीय कामगारांना स्वगृही सोडण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा बरौनीपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यातून १ हजार २३६ प्रवासी नागरिक रवाना झाले. तर दुसऱ्या बाजूला २५ जणांना विशेष बसने देखील रवाना करण्यात आलं. 

हेही वाचा - लाॅकडाऊनला कंटाळून नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा