लाॅकडाऊनला कंटाळून नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

लाॅकडाऊन असह्य झाल्याने एका इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लाॅकडाऊनला कंटाळून नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाची आत्महत्या
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, हाच लाॅकडाऊन असह्य झाल्याने एका इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये ही घटना घडली. सूरज सुर्वे (27) असं या मृत तरुणाचं नाव आहे.

लॉकडाउन लागू झाल्यापासून सूरज घरात एकटाच राहत होता. त्याचे सर्व कुटुंबीय हे गावी राहत आहे. लाॅकडाऊनमुळे कुटुंब गावाला अडकले. तर सूरज कोपरखैरणेत घरी अडकला. पण घरात एकटाच राहत असल्याने जीव घुसमटत होता. अखेर एकटेपणामुळे सूरजने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी सूरजने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण घरात एकटेच राहत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

खूप दिवस झाले एकटं राहतोय या घरात. हे घर मला एकट्याला खायला उठले आहे. सगळ्यांची खूप आठवण येत आहे. आठवण आली की एकटा रडत बसतो. बाहेरून कितीही खूश दिसत असलो तरी आतून खूप खचून गेलो आहे. फोनवर तरी किती बोलणार. जितकं जास्त फोनवर बोलायचो तितकी जास्त आठवण यायची आणि मग मी रडत बसायचो. घरच्यांपासून किती दिवस दूर राहावं लागणार आहे हे माहिती नाही. त्यामुळे मी माझ्या इच्छेप्रमाणे आत्महत्या करत आहे, असं सूरजने आपल्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं आहे.



हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा