Advertisement

फक्त २४ कर्मचारी आणि ४००० कॉल्स, पालिका नियंत्रण कक्षाची 'तारेवरची कसरत'

कोरोनाव्हायरसच्या संकटात पालिकेचं नियंत्रण कक्ष कमी मनुष्यबळात देखील काम करत आहे. वाचा त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या संकटांचा....

फक्त २४ कर्मचारी आणि ४००० कॉल्स, पालिका नियंत्रण कक्षाची 'तारेवरची कसरत'
SHARES
Advertisement

COVID 19 संदर्भात काही समस्या असतील किंवा कसली मदत हवी असेल की आपल्यापैकी अनेक जण पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतात. पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क केला की, तुम्हाला मदत मिळते.

पालिका मुख्यालयातील एनेक्सी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर नियंत्रण कक्षाचं  ऑफिस आहे. सध्या इथले कर्मचारी कोरोनाव्हायरससी लढा देण्यासाठी एकप्रकारे पालिकेची मदत करत आहेत. कोरोनाव्हायरसनं ग्रस्त रुग्णांसाठी अमब्युलंसची व्यवस्था करणे, रुग्णालयाची उपलब्धता तपासणे, आजारी रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरं देणे अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कमी मनुष्यबळ

नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या टिमकडून शक्य ती मदत केली जाते. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, दिवसभरात नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या या टिमला जवळपास ४००० कॉल येतात. पण हे काम करण्यासाठी फक्त २४ कर्मचारी सध्या उपस्थित आहेत. याआधी ४८ कर्मचारी कामावर होते. पण जवळपास २२ कर्मचाऱ्यांची कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सध्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील मनुष्यबळ कमी झाले आहे. विशेष म्हणजे इतक्या लगेच या सर्वांच्या जागी पर्यायी कर्मचारी शोधणं शक्य नाही.

"४००० कॉल येतात"

नियंत्रण कक्षात विशेष ड्युटीवर असलेले अधिकारी महेश नार्वेकर यांनी मुंबई मिररला सांगितलं की, “कोरोनाव्हायरस हा आजार होण्यापूर्वी आम्हाला दिवसाला सुमारे ८०० कॉल येत असत. आता दिवसाला सुमारे ४००० कॉल येतात. कमी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड ताणतणावाखाली काम करत आहोत. आमच्या मालकांना याची जाणीव आहे की आम्ही कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करत आहोत. आता इतक्या कमी वेळेत नवीन स्टाफ भरणं शक्य नाही.”

"अपुऱ्या सुविधा"

नियंत्रण कक्षाच्या एका कर्मचार्‍यानं नाव न सांगण्याच्या अटिवर माहिती दिली की, "कधीकधी अपुऱ्या सुविधांमुळे मदत पाठवण्यास विलंब होतो. २२ कर्मचारी कोरोनाव्हायरसमुळे हजर नाहीत. कमी स्टाफमध्ये आम्ही काम करत आहोत. त्यामुळे कॉल करणाऱ्याला अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते."

दुसऱ्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की “पाच दिवसांपूर्वी, एका कॉलरनं COVID 19 असलेल्या आपल्या आईला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका विचारली. आम्हाला कॉलला उत्तर देण्यासाठी सुमारे २५ मिनिटं लागली. रुग्णवाहिकेचं समन्वय साधण्यासाठी आणखी एक तास लागला. तोपर्यंत रुग्णाची प्रकृती खालावू लागली होती. त्या वाचल्या. पण जर आम्ही कॉलला उत्तर दिलं नसतं तर त्या वाचू शकल्या नसत्या."

नार्वेकर म्हणाले की, कमी वेळेत २२ कर्मचाऱ्यांना रिप्लेस करणे शक्य नाही. हॉस्पीटल शोधणं, रुग्णालयाची व्यवस्था करणं हे तांत्रिक ज्ञान पाहिजे. फक्त कॉलवर बोलण्याचं काम नसतं. तुम्हाला कंट्रोल रुममध्ये काम केल्याचा अनुभव देखील पाहिजे. या कामासाठी तुमचा वेग पण महत्त्वाचा असतो."


आक्षेपार्य कॉलनं त्रस्त

नार्वेकर पुढे म्हणाले की, "आक्षेपार्य कॉलनं देखील आम्ही अधिक त्रस्त आहोत. दोन दिवसांपूर्वी आम्हाला एक कॉल आला होता. पण तो कॉल घेण्यास आम्हाला उशीर झाला. कारण सर्व कर्मचारी इतर कॉलवर होते. पण त्या वक्तीचा कॉल घेतल्यावर त्यानं आम्हाला शिव्या देण्यास सुरुवात केली. असा घटनांमुळे आमचं खच्चीकरण होतं. पण तरी आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडतो."हेही वाचा

मेहबूब स्टुडिओतील क्वारंटाईन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा विरोध

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर

संबंधित विषय
Advertisement