Advertisement

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळी म्हणजे जी दक्षिण विभागात रुग्णसंख्या वाढीचा दर आता सर्वात कमी आहे.

मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढ घटली, 'असा' आहे वाॅर्डनुसार रुग्णवाढीचा दर
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता 30 हजारांच्या वर गेली आहे. रविवारी एका दिवसात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील कमी रुग्णसंख्या असलेल्या अनेक विभागांमध्ये आता रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉटमध्ये ठेरलेल्या विभागांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर घटला आहे. 

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळी म्हणजे जी दक्षिण विभागात रुग्णसंख्या वाढीचा दर आता सर्वात कमी आहे. जी दक्षिण विभागात रुग्णवाढीचा दर 3.4 टक्के आहे. तसंच रुग्णाचा डबलिंग रेटही 21 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील 8 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा दर 16 ते 22 मे दरम्यान 6.61 टक्के इतका आहे.

 रुग्णसंख्या वाढीचा दर 

  • एन वॉर्ड – घाटकोपर – 13.7 टक्के
  • पी नॉर्थ – मालाड, मालवणी, दिंडोशी – 11.9 टक्के
  • टी वॉर्ड – मुलुंड - 11.9 टक्के
  • पी साऊथ – गोरेगांव – 10.9 टक्के
  • एस वॉर्ड – भांडुप, विक्रोळी – 10 टक्के
  • आर साऊथ – कांदिवली – 9.4 टक्के
  • आर मध्य – बोरिवली – 8.9 टक्के
  • एफ साऊथ – परळ, शिवडी – 8.2 टक्के

 रुग्णसंख्या घटलेले वॉर्ड

  • जी साऊथ – वरळी, प्रभादेवी, लोअर परळ – 3.4 टक्के
  • ई वॉर्ड – भायखळा, भायखळा फायर ब्रिगेड – 4.2 टक्के
  • डी वॉर्ड – नाना चौक ते मलबार हिल परिसर – 4.6 टक्के
  • एम ईस्ट – गोवंडी, मानखुर्द – 6.1 टक्के
  • एच ईस्ट – वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला, कलानगर ते सांताक्रुझ – 7.4 टक्के
  • के वेस्ट – अंधेरी पश्चिम – 5.5 टक्के
  • एल वॉर्ड – कुर्ला - 7.4 टक्के
  • जी नॉर्थ – दादर, माहिम, धारावी – 5.1 टक्के
  • के ईस्ट – अंधेरी पूर्व, जोगेश्वरी – 7.8 टक्के
  • एम वेस्ट – चेंबुर – 6.3 टक्के
  • एफ नॉर्थ – सायन, माटुंगा, वडाळा – 4.6 टक्के
  • एच वेस्ट – वांद्रे, सांताक्रुझ पश्चिम – 7.5 टक्के
  • बी वॉर्ड – मशिद बंदर  – 6.3 टक्के
  • आर नॉर्थ – दहिसर – 6.5 टक्के
  • ए वॉर्ड – कुलाबा, कफ परेड, फोर्ट – 5 टक्के
  • सी वॉर्ड – पायधुणी, भुलेश्वर – 7.4 टक्के

हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा