Advertisement

कोरोनाचा कहर! मुंबईत १ लाख कोरोनाचे रुग्ण, दिवसभरात ११९९ नवे रुग्ण

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १७८ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ११५३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७० हजार ४९२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

कोरोनाचा कहर! मुंबईत १ लाख कोरोनाचे रुग्ण, दिवसभरात ११९९ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे.  तर मुंबईत शनिवारी दिवसभरात ११९९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६५ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे ११९९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १७८ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ११५३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ७० हजार ४९२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- University Exams 2020: यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना सर्वोच्च न्यायालयात

राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १४४ मृत्यू हे मुंबई मनपा-६५, ठाणे-१, नवी मुंबई मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-६,उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-८, रायगड-१, नाशिक-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१, पुणे-९, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, लातूर-१, उस्मानाबाद-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा