Advertisement

Coronavirus pandemic : मुंबईत कोरोनाचे ११८० रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू

राज्यात आज ३ हजार ३९५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत शनिवारी दिवसभरात १०७१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५३ हजार ४६३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic : मुंबईत कोरोनाचे ११८० रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे  २९५ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ११८० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Raj Thackeray: बाॅलिवूडमध्ये उसळलेल्या वादावर राज ठाकरे म्हणाले…

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६८ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे ११८०नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८२ हजार ८१४ इतकी झाली आहे. राज्यात आज ३ हजार ३९५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत शनिवारी दिवसभरात १०७१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५३ हजार ४६३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- यापुढं लाॅकडाऊनवर निर्णय एकमतानेच!

राज्यात आज कोरोनाच्या ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८३ हजार २९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३३९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ८ हजार ८२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  ८० हजार ९७५ नमुन्यांपैकी २ लाख ६४ नमुने पॉझिटिव्ह (१८.५१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९६ हजार  ३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-४, जळगाव-३, जळगाव मनपा-४, पुणे-१, पुणे मनपा-७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-४, सोलापूर मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-३, लातूर मनपा-१, अकोला-२, अकोला मनपा-१, यवतमाळ-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

संबंधित विषय