Advertisement

मुंबईत कोरोनाचा १२३७ नवे रुग्ण, ३० जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात ८५१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १६ हजार ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचा १२३७ नवे रुग्ण, ३० जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने २९६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १२३७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३० रुग्ण दगावले आहेत. तर २८ आॅगस्ट रोजी ३० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २९ आॅगस्ट रोजी एकूण ३१ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १२३७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४४ हजार ६२६ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ८५१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १६ हजार ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३  हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १६,४०८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा-१०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७  (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा-१६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१०७२ (२), सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा