Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १२४२ नवे रुग्ण, दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ६२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३३ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १२४२ नवे रुग्ण, दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १७० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२४२ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी   दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- सोशल मिडिया आणि व्हाँट्स अँपवरचे मेसेज पुढे पाठवताना घ्या काळजी

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. तर २० जून रोजी १३६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १९ जून रोजी रोजी एकूण ११४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १२४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६६ हजार ५०७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ६२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३३ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोनावर आली गोळी, १०३ रुपयांच्या गोळीचं मुंबईत उत्पादन सुरू

राज्यात  रविवारी कोरोनाच्या   ३८७० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात  ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६५ हजार  ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा