सोशल मिडिया आणि व्हाँट्स अँपवरचे मेसेज पुढे पाठवताना घ्या काळजी

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४९४ गुन्हे दाखल केले असून २६१ व्यक्तींना अटक केली आहे.

सोशल मिडिया आणि व्हाँट्स अँपवरचे मेसेज पुढे पाठवताना घ्या काळजी
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही  समाजकंटक सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक जण ते मेसेज अथवा पोस्ट खरी म्हणून पुढे दुसऱ्याला पाठवतात. असे करत असाल तर थांबा. कायद्यानुसार असे करणे गुन्हा आहे. अशाच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४९४ गुन्हे दाखल केले असून २६१ व्यक्तींना अटक केली आहे.


राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४९४ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३३ N.C आहेत) नोंद २० जून २०२० पर्यंत झाली आहे.  या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०३  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २६ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५७  गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २६१ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
संबंधित विषय