Advertisement

Coronavirus pandemic : मुंबईत १२६३ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६४ हजार ८७२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Coronavirus pandemic : मुंबईत १२६३ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे १७३ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत रविवारी दिवसभरात १२६३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या देखील COVID 19 पॉझिटिव्ह

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४४ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १२६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९२ हजार ७२० इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात १ हजार ४४१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६४ हजार ८७२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः राज्यात कोरोना मृतांचा आकडा १० हजार पार!

राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०,सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

संबंधित विषय
Advertisement