Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत कोरोनाचे १२६८ नवे रुग्ण, ६८ जणांचा दिवसभरात मृत्यू

तर गुरूवारी दिवसभरात ४ हजार ६७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २७ हजार २५९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic: मुंबईत कोरोनाचे १२६८ नवे रुग्ण, ६८ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २१९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२६८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६८ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १२६८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८९ हजार १२४ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ४ हजार ६७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख २७ हजार २५९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८ठाणे-८ठाणे मनपा-२०नवी मुंबई मनपा-५कल्याण-डोंबिवली मनपा-१८उल्हासनगर मनपा-३भिवंडी-निजापूर मनपा-९मीरा-भाईंदर मनपा-३पालघर-१वसई-विरार मनपा-७रायगड-९पनवेल मनपा-८नाशिक-३नाशिक मनपा-१अहमदनगर-१अहमदनगर मनपा-१जळगाव-६जळगाव मनपा-१नंदूरबार-२पुणे-२पुणे मनपा-१८पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४सोलापूर मनपा-४सातारा-३जालना-१लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा