Advertisement

अरे बापरे ! मुंबईत दिवसभरात ११४ जणांच्या मृत्यूची नोंद, १२६९ नवे रुग्ण

. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ४०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३२ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

अरे बापरे ! मुंबईत दिवसभरात ११४ जणांच्या मृत्यूची नोंद, १२६९ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाने १४२ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२६९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५५ मृत्यू हे १६ ते १८ जून चे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११४ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे १२६९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६४ हजार ०६८ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ४०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३२ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार  ७७३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


० १४ जून पर्यंत राज्यात २ लाख ६१ हजार २१० कोविड चाचण्या झालेल्या आहेत

० सक्रीय कंटेनमेंट झोन झोपडपट्टी आणि चाळी – ८२८

० सक्रीय सील बंद इमारती – ४८५९

० २४ तासांमधील संपर्काचा शोध अति जोखिम - ७५६९

०सद्या CCC1 मधील अति जोखिम संपर्क – २०३८४

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा