Advertisement

मुंबईत कोरोनाचे २३५२ नवे रुग्ण, दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू

गुरूवारी दिवसभरात १४१० जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७० हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २३५२ नवे रुग्ण, दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोनाने ३९४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात २३५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४३ रुग्ण दगावले आहेत. तर २९ सप्टेंबर रोजी ४९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १ आँक्टोंबर रोजी एकूण ४३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २३५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ७ हजार ४९४ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात १४१० जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७० हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-प्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना

मुंबईत ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णाची वाढत्या संख्येमुळं बंद केलेले विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या. मात्र तरीही अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच मुंबईच्या बोरिवली, वांद्रे (पश्चिम), ग्रॅण्ट रोड, अंधेरी (पश्चिम) भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा जोर वाढत आहे. मुंबईमधील बोरिवली (पालिकेचा विभाग आर-मध्य), वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम), ग्रॅण्ट रोड (डी), अंधेरी पश्चिम (के-पश्चिम) या विभागांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत अवघ्या ७ दिवसांमध्ये (२२ ते २८ सप्टेंबर) अनुक्रमे १,२७७, ६०७, ८११ आणि १,०८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बोरिवली आणि वांद्रे पश्चिम विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ अनुक्रमे ४६ व ४९ दिवस असून मुंबईतील अन्य भागांच्या तुलनेत या भागांतील हा काळ सर्वात कमी आहे. मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड (बी), परळ (एफ-दक्षिण), घाटकोपर (एन), कुर्ला (एल), दादर (जी-उत्तर), भांडुप (एस), चेंबूर-पर्व (एम-पूर्व) आणि एल्फिन्स्टन (जी-दक्षिण) या विभागांतील वाढत्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात आळा घालण्यात पालिका यशस्वी झाली आहे. त्यामुळे या भागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ८५ ते ९६ दिवसांच्या दरम्यान आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा