आज राज्यात ३,३१४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,१९,५५० वर पोहोचला आहे. राज्यात आज ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
हेही वाचाः- अॅमेझॉनला धडा शिकवला; 'त्या' मनसे नेत्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन
राज्यात आज २,१२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा १८,०९,९४८ वर पोहोचला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के झाले आहे. तर सध्या स्थितीमध्ये ५९,२१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्याासाठी एकूण १,२५,०२,५५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचाः- कोरोनामुळे माहिम दर्ग्याची १२० वर्षांची परंपरा खंडीत
तर मुंबईत ५७८ नवे रुग्ण आढळून आले असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ९० हजारांवर तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा २ लाख ७० हजारांवर पोहोचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत रविवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील मृतांचा आकडा ११ हजार ०७६ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज ४९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा २ लाख ७० हजार ६२८ वर गेला आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३५५ सक्रिय रुग्ण आहेत.