Advertisement

राज्यात आज ३ हजार ८३७ नवे रुग्ण, ८० जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत १५४७३ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १६१९१ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत.

राज्यात आज ३ हजार ८३७ नवे रुग्ण, ८० जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

आज राज्यात ३,८३७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आजचा कोरोनाबाधितांचा आकडा कमी आहे. तसेच आज ४१९६ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६८५१२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३९% एवढा झाला आहे.

हेही वाचाः- आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने दिली बदनामी कऱण्याची धमकी

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०८५६३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८२३८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५३५५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १५४७३ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १६१९१ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १९८६१ इतका आहे. देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement