COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने दिली बदनामी करण्याची धमकी

वेळ सायंकाळची असल्यामुळे अंधार होत होता. याच होणाऱ्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने पीडितेवर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी निर्जनस्थळी असल्यामुळे तिची हाक बहुदा कोणापर्यंत पोहचली नाही.

आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने दिली बदनामी करण्याची धमकी
SHARES

मुंबईच्या आरे येथील जंगलात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने  मुलीला पोलिसात गेल्यास सोशल मिडियावर तिचे अश्लील फोटो टाकून जिवे मारण्याची ही धमकी दिली. या प्रकरणी आरे पोलिसांनी एका ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचाः- बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार, दोन कंपनी मालकांना अटक

मुंबईच्या आरे काॅलनी परिसरात पीडित मुलगी आणि आरोपी दोघंही शेजारी शेजारी राहतात. ८  नोव्हेंबरला आरोपीने पीडित मुलीला फोन करून मित्राच्या एका प्रेमप्रकरणा विषयी बोलायचे असल्याचे सांगून पीडित मुलीला बोलावून घेतले. त्यानुसार पीडित मुलगी आरे काॅलनीतील बीएमसी शाळेजवळ आली. वेळ सायंकाळची असल्यामुळे अंधार होत होता. याच होणाऱ्या अंधाराचा फायदा घेऊन  त्याने पीडितेवर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी निर्जनस्थळी असल्यामुळे तिची हाक बहुदा कोणापर्यंत पोहचली नाही. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेला त्रास देण्याच्या हेतून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. घडलेल्या घटनेनंतर पोलिसात गेल्यास अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी आरोपीने तिला दिली होती.  

हेही वाचाः- पैसे न दिल्याच्या रागातून विकासकावर गोळीबार, दोघांना अटक

त्यानंतर आरोपी वारंवार मुलीला ब्लॅकमेल करत होता. रोजच्या या त्रासाला कंटाळून आरे काँलनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३७६, ३५४(ब), ५०६(ब), भा.द.वि कलमांसह ४,८,१२ पोस्कोसह ६७ आयटी अँक्ट अंतरर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा