पैसे न दिल्याच्या रागातून विकासकावर गोळीबार, दोघांना अटक

नोटबंदीच्या काळात फेयाज यांनी नोटबदली करण्याकरता फरहान यांची ओळख शेख यांच्यासोबत करून दिली होती.

पैसे न दिल्याच्या रागातून विकासकावर गोळीबार, दोघांना अटक
SHARES

उसने घेतलेले पैसे परत करू न शकलेल्या वांद्रेतील प्रसिद्ध विकासकावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी फरहान अजगर सय्यद (३०), फेयाज रफिक कुरेश (३३) याला अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी विकासकाला कार्यालयात बोलावून त्याला धमकावण्यासाठी गोळीबार केल्याचा दावा विकासकाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

तक्रारदार नासीर लतीफ शेख(४३) हे बांधकाम व्यावसायिक असून त्याचे वांद्रे (प) येथे कार्यालय आहे. त्याच परिसरात दोन्ही आरोपी हे देखील वास्तव्यास आहेत. यातील आरोपी फेयाज यांची शेख यांच्याबरोबर जुनी मैत्री होती. नोटबंदीच्या काळात फेयाज यांनी नोटबदली करण्याकरता फरहान यांची ओळख शेख यांच्यासोबत  करून दिली होती. तक्रारदार हे विकासक असल्यामुळे त्यांना कामानिमित्त कायम पैशांची गरज भासते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी विकासकाने या दोन्ही आरोपींकडून ४५ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. ठरल्यानुसार शेख हे नियमित दोन्ही आरोपींचे पैसे महिन्याला त्यांना पोहचवत होते. मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाची लाट देशात पसरली. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सर्वत्र लाँकडाऊन पुकारण्यात आले. सर्व काही ठप्प झाल्यामुळे विकासाचे आर्थिक मोठे नुकसान झाले.

हेही वाचाः- फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!

अशात त्याला आरोपी फरहान अजगर सय्यद व फेयाज रफीक कुरेश यांचे पैसे देणे शक्य झाले नाही. वारंवार सांगूनही शेखकडून पैसे मिळत नसल्यामुळे दोन्ही आरोपींनी शेखला वांद्रे पश्चिम येथील गॉडफ्रे इमारतीच्या तिस-या मजल्यावरील कार्यालयात बोलावले. त्यावेळी शेख गेले असता, पैशांच्या मागणीवरून दोन्ही आरोपींनी शेख यांना धमकावण्यास सुरूवात केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट पिस्तुल काढून शेख यांना धमकवण्यासाठी त्यांच्यावर गोळीबारही केला. सुदैवाने शेख त्यात जखमी झाले नाहीत. मात्र घडलेल्या प्रकारामुळे शेख यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अखेर घाबरलेल्या शेख यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी ५०४, ५०६ भादंवि सह हत्यारबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचाः- पाणी जपून वापरा; 'या' भागात २ व ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही

पोलिसांना एक रिकामी पुंगळीही सापडली असून घटनास्थळावरील एका गादीलाही छीद्र पडलेले दिसून आले आहे. तक्रारीनंतर कथित गोळीबार झालेले कार्यालय सील करण्यात आले असून बॅलेस्टीक तज्ज्ञांना याबाबतची माहिती देणार आहेत. ते संबंधीत पुंगळी व गादीची तपासणी करून गोळीबार झाला की नाही, त्याबाबत अहवाल सादर करतील. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले हत्यार अद्याप हस्तगत करण्यात आले नसून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी सय्यद व कुरेशी एअर कंडीशनचा व्यवसाय करतात. तसेच त्यांचे एसी दुरूस्तीचे दुकानही आहे. चौकशीत व्याजाची रकमेच्या लोभापाई ही रक्कम दिली असल्याचे सांगितले. ४५ लाखांची रक्कम आरोपींनी कुढून आणली याबाबतही तपास करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा