Advertisement

राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम
SHARES

दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केला आहे.

मिशिन बिगिन अगेन अतंर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यात १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा मावळली आहे.हेही वाचा-

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement