Advertisement

फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!

मुंबईतील प्रत्येक जण चेहऱ्याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे.

फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!
SHARES

कोरोना व्हायरसमुळं मुंबईसह देशातील नागरिक खबरदारी घेत आहेत. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे. त्यामुळं सर्दी, खोकला झाल्यास नाक व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा, खोकताना देखील हातावर रुमाल धरा असं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच, अनेकांनी रुमालाऐवजी मास्कचा वापर करणं पसंत केलं. त्यानुसार, मुंबईतील प्रत्येक जण चेहऱ्याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे. परतु, आता या मास्कमध्ये विविध प्रकार आल्यानं अनेक जण स्टाइल म्हणून आपल्या आवडीचं मास्क चेहऱ्यावर लावून घराबाहेर पडत आहेत. पण हे मास्क किती उपयोगी आहेत का?

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणार वाढ पाहत, तसंच, तोंडावाटे अथवा श्वसनातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असल्यानं, खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावत आहेत. मात्र, केवळ सर्जिकल मास्क न लावता नागरिक विविध प्रकार व डिझाइनचे मास्क घालत आहेत. नुकताच दिवाळी पार पडली असून, दिवाळीनिमित्त बाजारात नवनवीन ड्रेस विक्रीसाठी आले होते. या ड्रेससोबतच मास्कही विक्रीसाठी आले होते. अजुनही असे ड्रेस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून मास्कसुद्धा विक्रीसाठी आहेत.

ग्राहकांची या मास्क असलेल्या ड्रेसला मोठा मागणी आहे. कोरोनामुळं नागरिकांनी मास्क घालणं पसंत केल्यानं बाजारातही विविध प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. बाइक रायडिंग मास्क, साधा मास्क, रंगबेरंगी कपड्याचे मास्क असे विविध प्रकारचे व विविध रंगांचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलंही भुताची खोपडी, दातं यासरख्या डिझाइनचे मास्क घालत आहेत. मात्र या फॅशनेबल मास्कच्या माध्यमातून संरक्षण होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लोकांनी डिझायनर मास्क, शर्टाला मॅचिंग मास्क, साडी आणि पैठणीला मॅचिंग मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. ब्रॅण्डेड वस्तूंचा शौक असणाऱ्यांनी ब्रॅण्डेड कंपन्यांचे मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य घरगुती कापडी मास्क वापरतात, पण या मास्कमुळं कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळत असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. त्यामुळं या मास्कची स्डॅण्डर्ड व किमती निश्चित करण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनानं राज्य सरकारला केली आहे.

हल्ली टेलरच्या दुकानांपासून रस्त्यावर फेरीवाल्यांकडे, तयार कपडय़ांच्या दुकानांमध्ये कापडी मास्कची विक्री होते. अनेकजण मास्कचीही ट्रायल घेतात. कपड्यांवर, चेहऱ्यावर कसा दिसतो याची ट्रायल घेतात. मॅचिंग होत नसेल तर परत करतात. मात्र मास्कची ट्रायल अतिशय धोकादायक आहे.



हेही वाचा -

'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक

भारतात तयार होणारी कोविड लस ९० टक्के परिणामकारक, 'या' दिवशी देणार पहिली लस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा