बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार, दोन कंपनी मालकांना अटक

बनावट विक्री पावत्या तयार केल्याप्रकरणी नेहा इम्पेक्स व रोहिनी इम्पेक्स या दोन कंपन्या जीएसटी विभागाच्या रडावर आल्या होत्या.

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार, दोन कंपनी मालकांना अटक
SHARES

बनावट कंपन्यांच्या माध्यमातून विक्रीच्या बनावट पावत्या वितरीत करून सुमारे १४ कोटी रुपयांचे जीएसटी नुकसान केल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाने(जीएसटी) दोन कंपनी मालकांना अटक केली आहे. आरोपींनी दोन बनावट कंपन्यांच्या माध्यमातून बनावट पावत्या वितरीत करून २३३ कोटी रुपयांचा बनावट व्यवहार झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. हनीफ मोहम्मद नागरीया व फैजल मोहम्मद हनीफ नागरीया अशी अटक करण्यात आलेल्या दोन व्यावसायिकांची नावे आहेत.

हेही वाचाः- राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

बनावट विक्री पावत्या तयार केल्याप्रकरणी  नेहा इम्पेक्स व रोहिनी इम्पेक्स या दोन कंपन्या जीएसटी विभागाच्या रडावर आल्या होत्या. त्यावेळी तपासणी केली असता दोनही कंपन्या डमी व्यक्तींच्या नावावर उभारण्यात आल्या आहेत. तसेच त्यासाठी बनावट कागदपत्रांचाही वापर करण्यात आल्याचे जीएसटी विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीच्या माध्यमातून आरोपी हनीफ नागरियाच्या व फैजल नागरीया यांच्या अधिपथ्याखाली असलेल्या नऊ कंपन्यांना माल अथवा सेवा पुरवल्याच्या बनावट पावत्या देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मुळात अशा कोणत्याही वस्तू अथव सेवा पुरवण्यात आल्या नव्हत्या. केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवण्यात आले होते. त्यानंतर ९ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कपड्याची निर्यात झाल्याचे दाखवून कर परतावा मागण्यात आला.

हेही वाचाः- फॅशनेबल मास्क पण उपयोग कमीच!

व्यक्तीच्या नावे उभारण्यात आलेल्या या दोन बोगस कंपन्यांच्या नावावर २३३ कोटी २१ लाख रुपयांच्या विक्री पावत्या वितरीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या माध्यमातून निर्यात दाखवून १३ कोटी ८२ लाख रुपयांचा कर गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर हनीफ व फैजल या दोघांना नुकतीच जीएसटी विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने १० डिसेंबरपर्यंत दोनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा