Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण, ४६ जणांचा दिवसभरात मृत्यू

सोमवारी दिवसभरात १४०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९७ हजार ९९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण, ४६ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सोमवारी कोरोने २९३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत सोमवारी दिवसभरात ९२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ रुग्ण दगावले आहेत. तर ८ आँगस्ट रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ९ आँगस्ट रोजी एकूण ४८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय सोमवारी मुंबईत कोरोनाचे ९२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २४ हजार ३२२ इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात १४०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९७ हजार ९९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- गणपतीला गावी जाणाऱ्यांसाठी खूश खबर...

राज्यात आज २९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ (१८.९१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १०लाख ०१, हजार २६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५,२४,५१३ झाली आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा