Advertisement

Coronavirus updates: मुंबईत ५ नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबधितांची संख्या ११० वर


Coronavirus updates: मुंबईत ५ नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबधितांची संख्या ११० वर
SHARES

महाराष्ट्रात अजून ६ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारी ११० वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. वाढ झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ५ जण असून एक रुग्ण अहमदनगरचा आहे.

Maharashtra break up 110 (107 active cases and 3 deaths)

 • Pimpri : 12
 • Pune : 19
 • Mumbai : 44 
 • Nagpur : 4
 • Yamtval : 4
 • Kalyan : 5
 • Navi Mumbai : 4
 • A'nagar : 3
 • Panvel : 1
 • Thane : 2
 • Ulhasnagar : 1
 • Aurangabad : 1
 • Ratnagiri : 1 
 • Satara 2
 • Islampur sangali 4

महाराष्ट्रात करोनामुळे तिसऱ्या मृत्यूची नोंद झाली. या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात २३ मार्चला दाखल करण्यात आलं होतं. यूएईतून प्रवास करून आलेल्या या रुग्णाला ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. तसंच त्याला उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहाचा त्रास देखील होता.

काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता मात्र त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असा खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा