Advertisement

वरळीनंतर शिवाजीपार्कचे रस्तेे रंगवून केली जात आहे कोरोनाबाबत जनजागृती

लाँकडाऊनमध्ये शिथीलता दिली असली तरी धोका अजून टळलेला नाही. दादर परिसरात कोरोनाचे नव नवे रुग्ण समोर येेेत असताना. शिवाजी पार्क परिसरात नागरिकांचा वावर पून्हा वाढला आहे.

वरळीनंतर शिवाजीपार्कचे रस्तेे रंगवून केली जात आहे कोरोनाबाबत जनजागृती
SHARES
चीनमधील ज्या शहरात कोरोना विषाणूचा सर्वात पहिल्यांदा उद्रेक झाला, त्या वुहान शहराला कोरोनाबधितांच्या वाढत्या संख्येच्या जोरावर मुंबईने मागे टाकलं आहे. त्यामुळे लाँकडाऊनमध्ये जरी शिथीलता दिली असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळेच  शिवाजी पार्कच्या रस्त्यांवर कोरोना निरनिराळे संदेश देणारी पेटिंग करत जनजागृती केली जात आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी वरळी हे कोरोनाचे हाँटस्पाँट बनले होते. अशातच पालिकेसह आरोग्य अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून या परिसरातील कोरोनाचा प्रसार थांबवला. माञ हा प्रसार थांबवण्यासाठी रस्त्यांवर कोरोनाचे सुविचार लिहित काढलेली पेटिंग हे चर्चेचा विषय ठरली होती. घरा बाहेर पडल्यानंतर पावलो पावली रेखाटलेल्या या चिञांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही कालांतराने कमी झाली. त्याच पद्धतीने शिवाजी पार्क येथील रस्त्यांवर ही कोरोनाबाबत जनजागृती करता रेखाटलेली चिञ लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


लाँकडाऊनमध्ये शिथीलता दिली असली तरी धोका अजून टळलेला नाही. दादर परिसरात कोरोनाचे नव नवे रुग्ण समोर येेेत असताना. शिवाजी पार्क परिसरात नागरिकांचा वावर पून्हा वाढला आहे. सकाळ आणि संध्याकाळी या परिसरात व्यायामा करता येणाऱ्या नागरिकांची वाढलेली संख्या पाहता,  कोरोना संदर्भातील खबरदारी आणि काळजी घेण्याबाबत जनजागृतीपर संदेश चितारले जात आहेत. अफवा पसरवू नका, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा, नमस्कार करून समोरच्याचे स्वागत करा, घरातच रहा सुरक्षित रहा असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.


                 सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा