Advertisement

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

रुग्णाची तपासणी करत असताना एका नर्सलाच कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण
SHARES

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह नर्सही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. जीवाची पर्वा न करता डॉक्टर आपलं कार्य करत आहेत. परंतु, हेच काम करत असताना एका नर्सलाच कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये एका रुग्णाची चाचणी करण्यात आली. रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या परंतु, कोणत्याही परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नसलेल्या रुग्णाची चाचणी करण्यात आली होती. तसंच, ही चाचणी कोव्हिड १९साठी पॉझिटिव्ह आली आहे. उपचारादरम्यान या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सलाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं जसलोक रुग्णालयामध्ये या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्सच्या तसंच, इतर वैद्यकीय तज्ज्ञांचं विलगीकरण करण्यात आलं आहे.

या रुग्णाच्या थेट व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांचं कोव्हिड १९च्या नियमावलीनुसार विलगीकरण करण्यात आलं आहे. रुग्णालयामधील वैद्यकीय कर्मचारी तसंच, दाखल असलेल्या सर्व रुग्णांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं सूचना देण्यात आल्याचं जसलोक रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. संबंधित रुग्णाचे अहवाल कोव्हिड १९साठी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या नर्सचा वैद्यकीय अहवाल तपासण्यात आला. त्यावेळी त्या नर्सचा तपासणीचा अहवालही कोव्हिडसाठी पॉझिटिव्ह आला. 

संबंधित नर्सला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळताच रुग्णालयाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच, कोव्हिडसाठी विशेष तयार केलेल्या वॉर्डमध्ये त्या नर्सला ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. सध्याचे काही दिवस देशासाठी व राज्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.  हेही वाचा -

घर बसल्या करा कोरोना व्हायरसची चाचणी, जाणून घ्या कशी?

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी माझा महिन्याचा नाही वर्षाचा पगार घ्या - जितेंद्र आव्हाडसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा