कोरोना विरुद्ध लढ्यासाठी माझा महिन्याचा नाही वर्षाचा पगार घ्या - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही (Jitendra Avhad) देखील मदतीसाठी सरसावले आहेत.

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी माझा महिन्याचा नाही वर्षाचा पगार घ्या - जितेंद्र आव्हाड
SHARES

कोरोनाच्या लढाईसाठी देशभरातून मोठी मदत सुरू आहे. अगदी उद्योगपती, अभिनेते, खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. नाम फाऊंडेशनच्या वतीनं नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधी आणि पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले असून कोरोनाच्या लढाईत हातभार लावत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही (Jitendra Avhad) देखील मदतीसाठी सरसावले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. केवळ महिन्याचा नको तर या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार यांनी एक महिन्याचा पगार राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. माझा या वर्षीचा पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा आव्हाडांनी केली आहे.

कोरोना पाठोपाठ आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. परंतु कोरोनाच्या संकटात लढणारे डाॅक्टर आणि पोलिसांच्या वेतनात कपात कशाला? असा प्रश्न राज्य सरकारला लगेच विचारण्यात येऊ लागला. परंतु ही वेतन कपात नसून या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत वेतन देण्यात येईल, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केला.हेही वाचा

पोलीस, डाॅक्टरांचा पगार कापण्यापेक्षा आमदारांचा १०० टक्के पगार कापा- नितेश राणे

वेतन कपात नव्हे, वेतन २ टप्प्यांत, अजित पवार यांचा खुलासा

संबंधित विषय