Advertisement

घर बसल्या करा कोरोना व्हायरसची चाचणी, जाणून घ्या कशी?

मुंबईकर काही शुल्क भरून स्वत: साठी कोरोना व्हायरसची चाचणी करून घेऊ शकतात.

घर बसल्या करा कोरोना व्हायरसची चाचणी, जाणून घ्या कशी?
SHARES

भारतासह संपूर्ण जग यावेळी कोरोनाशी लढा देतंय. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म प्रॅक्टोनं (Practo) जाहीर केलं आहे की, मुंबईकर काही शुल्क भरून स्वत: साठी कोरोना व्हायरसची चाचणी करून घेऊ शकतात. यासाठी, त्यांना प्रथम बुकिंग करावं लागेल. ३१ मार्चपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे.

कोरोना व्हायरसनं (Coronavirus)  संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. तज्ञ अधिकाधिक लोकांची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) जेवढ्या जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करू तेवढं चागलं असं स्पष्ट केलं आहे.

अहवालानुसार, कोरोनाची (Covid 19) चाचणी घेण्यासाठी प्रॅक्टोनं थायरोकेयरबरोबर हात मिळवणी केली आहे. याव्यतिरिक्त, त्यांना या कामासाठी भारत सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)कडून मान्यताही मिळाली आहे. तुम्हाला प्रॅक्टो किंवा थायरोकेअरच्या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.

जर कोणा व्यक्तीला कोरोना विषाणू चाचणीसाठी बुकिंग करायचे असेल तर त्यांना प्रथम डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांनी स्वाक्षरी केलेला फॉर्मची आवश्यक्ता आहे. चाचणीच्या वेळी फोटो आयडी कार्ड असणं आवश्यक आहे. या चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाईल.

बुकिंग केल्यानंतर, कंपनीतील कोणताही सदस्य आपल्या घरी येईल आणि आपला नमुना घेईल. हे नमुने व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) मधील थायरोकेअर लॅबमध्ये पाठवले जातील. कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी सरकारनं या प्रयोगशाळांना अधिकृत केलं आहे. नमुना घेतल्यानंतर, चाचणी अहवाल वेबसाइटवर २४ ते ४८ तासांच्या दरम्यान उपलब्ध असेल. जिथून तुम्ही पाहू शकता.

कंपनीचे अधिकारी डॉ. अलेक्झांडर कुरुविला म्हणाले की, साथीचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्या आवश्यक आहेत. आम्ही थायरोकेयरशी करार केला आहे. जेणेकरून कोणालाही याचा त्रास होणार नाही. प्रशासनासोबत आम्ही एकत्रपणे काम करत आहोत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा ३०० च्या वर गेला आहे. मुंबईतच एका दिवसात कोरोनाचे ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात चिंतेचं वातावरण आहे. पण राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.



हेही वाचा

Corona Virus: रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण, 32 जणांची होणार तपासणी

दूध विकत घेऊन त्याची भुकटी करणार, राज्य सरकारचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा