Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना
SHARES

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या महिला अधिकाऱ्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर राहत नाहीत. ते मातोश्री बंगल्यावर राहतात. मात्र, महत्त्वाच्या बैठका आणि शासकीय कामकाजांसाठी मुख्यमंत्र्यांची ये-जा वर्षा बंगल्यावर सुरू असते.  याआधी मुख्यमंत्र्याचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील चहावाल्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावरच या चहावाल्याचा स्टॉल होता. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी मिळून 42 कर्मचाऱ्यांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने कोरोना तापसणी देखील केली गेली होती.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.१२ एप्रिलला त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. १४ एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा करोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सागरवर तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा