Advertisement

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०६८ वर पोहोचली


राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०६८ वर पोहोचली
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं भारतासह जगभरात थैमान घातला आहे. इतर देशांप्रमाणं भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढ आहे. देशातील रुग्णांची संख्या २७ हजार ८६२ वर पोहचली आहे. तर कोरोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८७९ वर पोहचली आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यानुसार, महाराष्ट्राती कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्येतही वाढ झाली आहे. राज्यात रविवारी ४४० नं वाढ होऊन ही संख्या आता ८०६८ झाली आहे. यापैकी ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं एक मोठा दिलासा मिळाला आहे. नुकताच मुंबईतील ३१ पत्रकरांनाही कोरोनावर यशस्वी मात केल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रकारांची कोरोनाकरीता चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दुसऱ्या चाचणी अहवालात निगेटीव्ह आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा