Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील आरोपींद्वारे मास्कची निर्मिती


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील आरोपींद्वारे मास्कची निर्मिती
SHARES

कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये आरोपींद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे.

हेही वाचाः- तारक मेहताचे चित्रीकरण सुरु राहू द्या, निर्मात्याची सरकारकडे मागणी

अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह आरोपींद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्याचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत श्री.देशमुख यांनी मास्कनिर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ मास्कनिर्मितीला प्रारंभ केला. हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. बंद्यांनाही त्याचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जात आहे.

 हेही वाचाः- Corono virus:  मुंबईत बार, पब, डिसको, आॅर्केस्ट्रा बारवर बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुरुंगातील कैद्यांची ही विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोगाग्रस्तांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याने रुग्णालया समोरील आर्थररोड तरुंगातील कैद्यांना त्याची बाधा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आधिच तुरुंगात आवश्यकतेहून अधिक कैदी तुरूंगात असल्याने कैद्यांची गैरसोय होत असल्याने तुरूंगातील कैद्यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर तर काही कैद्यांना जामीनावर मुक्त केले असल्याचे सांगण्यात येते.


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा