Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत 1413 नवे रुग्ण, दिवसभरात 40 जणांचा मृत्यू

मुंबईत सोमवारी दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत 1413 नवे रुग्ण, दिवसभरात 40 जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे 76 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1413 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी   दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 रुग्ण दगावले आहेत. तर 27 मे रोजी 32 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 28 मे रोजी रोजी एकूण 38 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे 1413 नवीन रुग्ण आढळले आहेत.


मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 40 हजार 887 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात  करोनाचे 193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण 16 हजार 987 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती


अतिदक्षता विभागातील(ICU) व्यवस्था - 645

व्हेंटिलेटरवर व्यवस्था-  373

सीसीसी 2 मधील व्यवस्था - 29740

डायलसिस उपकरणे - 92


मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती


कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 700

सीलबंद इमारती - 3110

अती जोखीम - 8864

कमी जोखीम 18, 861

सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 59, 193

एकूण कोविड चाचण्या - 2 लाख 1 हजार 507


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा