Advertisement

महाराष्ट्रातून ८२२ विशेष श्रमिक ट्रेनमधून 'इतके' लाख परप्रांतीय कामगार परतले

एक मे एक जून या महिनाभरात जवळपास ११ लाख ८६ हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.

महाराष्ट्रातून ८२२ विशेष श्रमिक ट्रेनमधून 'इतके' लाख परप्रांतीय कामगार परतले
SHARES
महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात  जवळपास ११ लाख ८६  हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन
आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४५० बिहारमध्ये १७७, मध्यप्रदेशमध्ये ३४, झारखंडमध्ये ३२, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १७,
राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून १३६, लोकमान्य टिळक टर्मिनल १५४, पनवेल ४५, भिवंडी ११, बोरीवली ७१, कल्याण १४, ठाणे ३७, बांद्रा टर्मिनल ६४, पुणे ७८, कोल्हापूर २५, सातारा १४, औरंगाबाद १२, नागपुर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

 मदतीसाठी -९८ हजार फोन
     पोलीस विभागाचा  १०० त्रनंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात या फोनवर  ९८,६४२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९२,५८० व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७६,८८३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिस कोरोना कक्ष
  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील १५पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १६ , पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३,ए.टी.एस.१,ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१ अशा २७ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९१ पोलीस अधिकारी व १३२३ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या एकूण ८१० रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३७,९९४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा