Advertisement

कॉर्पोरेट केंद्राची स्वच्छतेकडे वाटचाल


कॉर्पोरेट केंद्राची स्वच्छतेकडे वाटचाल
SHARES

मुंबईचे कॉर्पोरेट जगत अशी नरिमन पॉइंटची ओळख आहे. पण या परिसरात स्वछतेचा अभाव आणि प्रदूषणात वाढ होत असल्याने त्या विभागातील रहिवासी कुंती ओझा यांनी क्लिन मुंबई काऊन्सिल या एएलएमची स्थापना केली. आपले शहर स्वछ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक रहिवासी पालिकेची मदत घेत कार्यक्रम राबवतात.

क्लिन मुंबई काऊन्सिल एएलएम आणि क्लिन मुंबई फाऊंडेशन यांच्या माध्यमातून कुलाबा, नरीमन पॉईंट या विभागात झाडे लावणे, परिसर स्वछ ठेवणे आणि लोक सहभागातून विभागाचा विकास व्हावा या उद्देशाने एएलएमची स्थापना केली असल्याचे तिथले स्थानिक सांगतात. एवढंच नाही तर नरीमन पॉईंटच्या मित्तल चेंबरमध्ये ओल्या कचरापासून खत बनवण्यासाठी खास मशीन लावण्यात आली आहे. कॉर्पोरेट जगताचे लक्ष स्वछतेकडे वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे क्लिन मुंबई काऊन्सिल एएलएमच्या अध्यक्षा कुंती ओझा यांनी सांगितले.

नरिमन पॉइंटमधील जवळपास आठ इमारती या क्लिन मुंबई काऊन्सिल एएलएमच्या अंतर्गत येतात. या भागातून दर महिन्याला 3 लाख 25 हजार मॅट्रिकटन कचरा गोळा होतो. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या अ विभागाची वेळोवेळी मदत घेतली जाते, असे पालिकेचे एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांनी सांगितले.

या एएलएमच्या माध्यमातून विभागातील बरीच कामे केली जातात. त्यामुळे आज हा विभाग सुंदर, हरित आणि स्वछ दिसत आहे. आता कॉर्पोरेट जगतातील लोक देखील सहकार्य करत असल्याचे तिथल्या स्थानिकांनी म्हटले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा