निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक लागले कामाला

 Andheri
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक लागले कामाला
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक लागले कामाला
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक लागले कामाला
See all

विलेपार्ले - पालिका निवडणुका तोंडावर असताना सर्व नगरसेवक आणि संभाव्य उमेद्वार निवडणूक पूर्व तयारीला लागलेत. यामध्ये विधानसभा के पूर्व विभागाच्या विद्यमान नगरसेविका तसंच प्रभाग समितीच्या अध्यक्षा शुभदा पाटकर या देखिल मागे नाहीत. त्यांनी वॉर्ड क्रमांक 84 येथील तावडे चाळ, यादव चाळ, सांडमचाळ येथे रविवारी लादी बसवण्याच्या कामाचा शुभारंभ केला. तसंच विभागातील मल:निसरण वाहिन्यांचे काम आणि तपासणी, शौचालय दुरुस्ती, रस्त्यावरील दिवे इत्यादी कामांचा देखिल स्थानिक जेष्ठ नागरिक आणि महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

त्याच परिसरातील आजूबाजूच्या इमारतीतल्या नागरिकांशी देखिल संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत महिला शाखा संघटक रुपाली शिंदे देखिल सामिल होत्या.

Loading Comments