Advertisement

20 डिसेंबरनंतर नगरसेवक नॉट रिचेबल


20 डिसेंबरनंतर नगरसेवक नॉट रिचेबल
SHARES

मुंबई - 20 डिसेंबरनंतर पालिकेचे नगरसेवक नॉट रिचेबल होणारायत. 2012 मध्ये महापालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत आता संपत येतेय. त्यामुळे नगरसेवकांना दिलेली मोबाइल सेवा 20 डिसेंबरपासून खंडीत करण्यात येणाराय. तत्पूर्वी नगरसेवकांनी मोबाइलचे सीमकार्ड 14 डिसेंबपर्यंत पालिकेच्या चिटणीस कार्यालयात परत करावे, असे सूचित करण्यात आलं आहे. पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांनी एकमतानं हा निर्णय घेतलाय. मोबाईल सिमकार्ड प्रमाणेच पालिकेने नगरसेवकाना लॅपटॉप दिले आहेत. हे लॅपटॉपही आता परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगण्यात आलंय.
2012 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या 227 आणि नामनिर्देशित 5 अशा 232 नवीन नगरसेवकांना प्रभाग क्रमांकानुसार मोबाइल सिमकार्ड दिले होते. या क्रमांकाचे येणारे बील पालिका अदा करीत आहे. पालिकेची निवडणूक जवळ आल्यानं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 100 दिवस अगोदर आपले सिमकार्ड जमा करावे, असे पत्र पालिकेच्या चिटणीस विभागानं नगरसेवकांना पाठवले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा