पालिकेचे नगरसेवक झाले नॉटरिचेबल

 Pali Hill
पालिकेचे नगरसेवक झाले नॉटरिचेबल

मुंबई - महापालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन पालिकेत दाखल झालेल्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात येत आहे. 2017 ची पालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नगरसेवकांना दिलेली मोबाइल सेवा 20 डिसेंबरपासून खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र 23 डिसेंबर उजाडल्यानंतरही नगरसेवकांचे सिम कार्ड चालूच होते. त्यामुळे पालिकेच्या वतीने शुक्रवारी 23 डिसेंबरला दुपारी नगरसेवकांची मोबाइल सेवा खंडित करण्यात आली. पण कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारी अचानक सिम खंडित केल्याचं प्रभाग क्रमांक 218 चे नगरसेवक संपत ठाकूर यांनी सागितलं. त्यामुळे ज्यांच्याकडे खासगी क्रमांक नाही ते आमच्याशी संपर्क कसे साधतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Loading Comments